एकतीस हजारांपैकी साडेपाच हजार रुग्णांना मिळाला "जनआरोग्य' चा लाभ

एकतीस हजारांपैकी साडेपाच हजार रुग्णांना मिळाला "जनआरोग्य' चा लाभ

सातारा : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तब्बल साडेपाच हजार कोरोनाबाधितांवर उपचार करता आले आहेत. यामध्ये कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाडमधून सर्वाधिक तब्बल तीन हजार 029 रुग्णांवर उपचार झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 31 हजारांवर असून, त्यापैकी केवळ साडेपाच हजार रुग्णांनाच या योजनेचा लाभ घेता आला आहे. एकूण रुग्णसंख्येच्या 17.74 टक्केच रुग्णांना योजनेचा फायदा झाल्याचे चित्र आहे. दररोज बदलणारे निकष आणि सर्वांचा या योजनेत समावेश केल्याने योजनेतून उपलब्ध बेडही कमी पडत आहेत.

जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील 24 रुग्णालयांचा समावेश झाला आहे. यामध्ये शासकीय तसेच जिल्हा प्रशासनाने अधिगृहित केलेल्या रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेत पात्र असलेल्या केशरी आणि दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येतो. पण, सध्या जागतिक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने सर्वच लाभार्थ्यांना ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, जिल्ह्यात या योजनेतून केवळ 24 रुग्णालयांतच उपचार मिळतो. त्यामुळे इतर ठिकाणी उपचार करणाऱ्या केशरी व दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना उपचाराचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे लाभार्थी असूनही योग्य रुग्णालय न मिळाल्याने रुग्णांवर पैसे भरण्याची वेळ येत आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 31 हजारांवर गेला आहे. त्यामुळे दररोज उपचारासाठी रुग्णांना बेड कमी पडत असताना मिळेल तेथे उपचार घेऊन रुग्ण बरा करणे इतकेच काम आता उरलेले आहे.

पावसामुळे कोबीवर घाण्या, करप्या रोगाचा प्रादुर्भाव 
 
शासनाने सर्वच प्रकारच्या लाभार्थ्यांवर कोविडसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार 530 रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामध्ये कृष्णा हॉस्पिटलमधून सर्वाधिक तीन हजार 029 रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. पण, या योजनेसाठी अधिकृत केलेल्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने योजनेचा लाभ कोविड रुग्णांना मिळू शकत नाही. सध्या या योजनेच्या लाभाबाबत अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
 
आता सर्वांचा या योजनेत समावेश केल्यानंतर 24 रुग्णालये वगळता इतर रुग्णालयांत होणाऱ्या उपचारासाठी कॅशलेस सुविधा शासनाने उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. पण, त्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. एकूणच या योजनेचा लाभार्थी ठरविताना पुढे उपचार उपलब्ध आहेत का, याची कोणतीही माहिती शासनाने घेतलेली नसल्याने चांगल्या योजनेपासून अनेक कोविड रुग्ण वंचित राहात आहेत. परिणामी त्यांना खिशातून पैसे मोजावे लागत आहेत. 

पाळी सुसह्य करण्यासाठी साता-यातील मायलेकीची धडपड!

आतापर्यंत वार्षिक एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या व केशरी आणि दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांनाच योजनेतून कोविडवर उपचार करता येत होते. यामध्ये आता बदल करून सर्वांचा समावेश केला. तसेच ज्यांचे रेशनकार्डच नाही, त्यांना तहसीलदारांचे पत्र व एक स्वयंघोषणापत्र देऊन या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. पण, त्यासाठी जिल्ह्यातील 24 अधिकृत केलेल्या रुग्णालयांतच उपचार मिळावे लागतात. त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वांना घेता येत नसल्याचे चित्र आहे. 

...असे मिळाले "जनआरोग्य'तून उपचार 

जनआरोग्य योजनेतून हॉस्पिटलनिहाय उपचार मिळालेल्या रुग्णांची संख्या अशी : बेल एअर हॉस्पिटल पाचगणी तीन, जिल्हा रुग्णालय सातारा 378, धन्वंतरी हॉस्पिटल म्हसवड चार, गितांजली हॉस्पिटल वाई 330, घोटवडेकर हॉस्पिटल वाई 321, आयएमआर मायणी 255, निकोप हॉस्पिटल फलटण 27, कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड 3029, मानसी हॉस्पिटल खंडाळा 36, सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड 584, संजीवनी हॉस्पिटल सातारा 74, सावित्री हॉस्पिटल लोणंद 116, एरम हॉस्पिटल कऱ्हाड 257, मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा 116. 

Edited By : Siddharth Latkar


 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com