
सातारा: जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने नदीकाठच्या गावांसह दरडप्रवण भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, सातारा व वाई तालुक्यातील साडेतीनशेच्या वर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरस्थिती निर्माण झालेल्या पाटण तालुक्यातील काही गावांचा दौरा करून प्रत्यक्ष स्थिती व प्रशासकीय मदतीचा आढावा घेतला.