
सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील ११६ केंद्रांवर ३८ हजार ४९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले असून, ४० हून अधिक भरारी पथकांची नेमणूक केली आहे.