
कास: सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने डांगरेघर (ता. जावळी) येथे खैराच्या झाडाची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले. यामध्ये लाकूड व एक पिकअप टेंपोही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेंपोचालक विजय सखाराम जुनघरे (वय ३७, रा. सावली, ता. जावळी) व सुनील मर्ढेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.