पंतप्रधानांनी शपथ घेतली, की संसद आत्महत्या करते: पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणsakal
Updated on: 
Summary

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्यानंतर संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. फक्त तेथे जाऊन वेळ मिळाला तर बोलायचे.

कऱ्हाड (सातारा) : लोकसभेची निवडणूक लागली की पक्ष आपला नेता निवडून देतो. तो नेता निवडला की त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होतो. तो पंतप्रधान होतो. त्या व्यक्तीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली की संसद आपली आत्महत्या करते. असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कराडमध्ये अ‍ॅड. आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विधी सल्ला शिबीर झाले. त्यावेळी ते बोलत होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
कऱ्हाड, साताऱ्यात सेना आक्रमक;पाहा व्हिडिओ

आमदार चव्हाण म्हणाले, त्यानंतर संसदेला काहीही अधिकार राहत नाहीत. फक्त तेथे जाऊन वेळ मिळाला तर बोलायचे. नाहीतर भत्ता घ्यायचा आणि घरी जायचं. आपल्या देशात अमेरिका इंगलंडमध्ये नाही तो पक्षांतर बदलाचा आता वापर होऊ लागला आहे. पक्षांतर्गत कायदे बंदीचा पूनर्विचार करायला हवा. खासदार आणि आमदारांना पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com