पंकजाताईही महाबळेश्वरच्या प्रेमात, ट्विटद्वारे दिली माहिती आणि फोटोही केले शेअर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

मुंडे यांच्या या आत्मीयतेबद्दल समाज माध्यमावर कौतुक होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचा हा पहिला कुटुंबियासोबतचा महाबळेश्वरचा दौरा आहे.

सातारा : महाबळेश्वर हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून, येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेदेखील आवडते ठिकाण असून ते नेहमी या प्रेक्षणीय स्थळाला भेट देतात. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेही सध्या महाबळेश्वरला कुटुंबियांसोबत आल्या आहेत.

नुकतंच त्यांनी मुलगा आणि पतीसोबत महाबळेश्वरची छोटी टूर केली. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पंकजा मुंडे यांनी या टूरच्या निमित्ताने आलेले काही अनुभवही शेअर केले आहेत. 

हेही वाचा - प्रशांत पाटील गडाखांचे हे असे असतंय 

पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या बाबतची माहिती दिली. “लोकांच्या प्रेमाचा परिचय कसा येतो याचा काही अंदाज बांधता येत नसतो. पण, मला सुदैवाने असा अनुभव सदैव येतो. दोन दिवस हवा बदल म्हणून मी पती आणि मुलासमवेत महाबळेश्वर येथे गेले होते. परत येताना रस्त्यात नेहमी प्रमाणे लोकांनी हात करून गाडी थांबवली ड्रायव्हर लोंढे होते. त्यांनी अगदी भावूक होऊन माझ्या कार्यक्रमाची इतंभूत माहिती ते कशी ठेवतात हे सांगितले.

अगदी माझ्या पोस्ट किती ते आपुलकीने लाईक करतात हेही सांगितले. तितक्यात गाडीतील विद्यार्थी उतरले बाजूच्या बस मधील प्रवासी उतरले त्यांनी ही फोटो काढले. गाडीत बसलेला माझा मुलगा कौतुकाने हे बघत होता”, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं.

मुंडे यांच्या या आत्मीयतेबद्दल समाज माध्यमावर कौतुक होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंचा हा पहिला कुटुंबियासोबतचा महाबळेश्वरचा दौरा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister Pankaja Munde with his family in Mahabaleshwar