काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 13 जुलै 2020

हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्‌सऍप ग्रुप आदींद्वारे शंका निरसन करण्यात आल्या.

सातारा : मीटर रिडिंग सुरू झाल्यामुळे लॉकडाउनच्या महिन्यांमधील अचूक वीज वापराचे व समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. याबाबत वीजग्राहकांत निर्माण झालेला संभ्रम दूर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार वीज ग्राहकांनी 47 कोटी 68 लाख रुपयांच्या वीजबिलांचा भरणा केला आहे.
जाणून घ्या महावितरणचा व्हॉट्‌सऍप क्रमांक; घरुनच नोंदवा विजेबाबतच्या तक्रारी 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडिंग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्याचे सरासरी वीजबिल देण्यात आले. काही ग्राहकांकडे 23 मार्चनंतर मीटर रिडिंग होऊ शकले नाही. त्यांना मार्चसह एप्रिल व मे महिन्याचे बिल सरासरीने देण्यात आले आहे. त्यानंतर एक जूनपासून मीटर रिडिंग सुरू केल्यामुळे लॉकडाउनच्या या दोन-तीन महिन्यांत वीजग्राहकांनी प्रत्यक्षात केलेल्या वीज वापराचे अचूक मीटर रिडिंग उपलब्ध झाले व त्याचे समायोजित वीजबिल जूनच्या बिलासह देण्यात आले आहे. जून महिन्यात तीन ते चार महिन्यांच्या कालावधीच्या रिडिंगनुसार वीजबिल दिल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणकडून प्रत्येक कार्यालयात मदत कक्ष, वेबिनार, मेळावे, व्हॉट्‌सऍप ग्रुप आदींद्वारे शंका निरसन करण्यात आल्या. यासोबतच वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी देखील वीजबिलांची आकारणी नियमानुसार व योग्य असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला.

शेतकऱ्यांसाठी उदयनराजे समर्थकांचा 'या' गाेष्टीला विरोध  

त्यामुळे वीज ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा वेगाने सुरू केला आहे. गेल्या महिन्याभरात कऱ्हाड विभागात 80 हजार 300 ग्राहकांनी 13 कोटी 55 लाख, फलटण विभागात 38 हजार 300 ग्राहकांनी सात कोटी तीन लाख, सातारा विभागात 91 हजार 200 ग्राहकांनी 18 कोटी 44 लाख, वडूज विभागात 30 हजार 850 ग्राहकांनी चार कोटी 25 लाख आणि वाई विभागात 25 हजार 300 ग्राहकांनी चार कोटी 41 लाख रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.

सावधान! लग्न समारंभास 'याच' नातेवाईकांनी उपस्थित रहा, अन्यथा...

बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी!  

ते आले... जेवले... गप्पा मारल्या अन्‌... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty Eight Crore Rupees Electricity Bill Recovered In Satara District