पाडेगावातील खूनप्रकरणी चौघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Four arrested in Padegaon murder case Youth killed for harassing sister

पाडेगावातील खूनप्रकरणी चौघांना अटक

सातारा/लोणंद - पाडेगाव (ता. खंडाळा) येथे तीन महिन्यांपूर्वी युवकाचा गळा चिरून झालेला खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात लोणंद पोलिसांना यश आले. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

गणेश बापू कडाळे व दत्ता मारुती सरक (दोघे रा. पाडेगाव), प्रकाश ऊर्फ अजित किसन गोदेकर व योगेश श्रीरंग मदने (दोघे रा. कोरेगाव, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत. दहा मे रोजी पहाटेच्या सुमारास घराबाहेर खॉटवर झोपलेल्या राहुल मोहिते या तरुणाचा गळा चिरून खून झाला होता. याबाबत लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांना घटनास्थळावरून सुगावा लागेल, अशा कोणत्याही वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान होते.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनीही या गुन्ह्याचा कसून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे व पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे हे तपासावर लक्ष ठेवून होते. गेले तीन महिने लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे शोध घेत होते. त्याला यश आले आहे. या खूनप्रकरणी चार जणांना अटक केली असून, अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Web Title: Four Arrested In Padegaon Murder Case Youth Killed For Harassing Sister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..