Satara Crime: तार चोरीप्रकरणी चौघांना अटक; फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई
Electric Wire Theft Busted in Phaltan: या प्रकरणात सचिन संभाजी जाधव (रा. राजाळे, ता. फलटण) व त्यांचे इतर साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार धर्मराज जाधव, सूरज बेलदार, सागर जाधव व रजत मदने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Phaltan Rural Police arrest four for electric wire theft; stolen cables recovered.Sakal
फलटण : इलेक्ट्रिक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चार जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून, १० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.