
Legal Action in Karad: Navratri Mandals Face Charges Over Noise and Permit Breach
कऱ्हाड : नवरात्रोत्सवात दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसतानाही मिरवणूक काढल्याबद्दल दोन, तसेच वाद्य वाजण्याची वेळ न पाळल्याबद्दल दोन अशा चार मंडळांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तीन दिवसांपासून येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. आजअखेर दाखल गुन्ह्याची संख्या १० वर गेली आहे.