कऱ्हाड : आयपीएल सामन्यावर सट्टा; चार युवकांना अटक

सचिन शिंदे
Monday, 19 October 2020

पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, शरद बेबले, मंगेश महाडिक, मुनीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, संजय जाधव, विजय सावंत यांनी कारवाईत भाग घेतला. त्याबाबत शहर पोलिस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कऱ्हाड : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या गोळेश्‍वर (कऱ्हाड) येथील अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौघांना अटक केली. वसीम इक्‍बाल मेमन (वय 33, रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड), समीर जावेद शेख (वय 20, रा. कार्वे नाका, कऱ्हाड), मुनीर दस्तगीर चबनुर (वय 29, रा. शनिवार पेठ, कऱ्हाड) व जैद जल्लाउद्दीन पालकर (वय 22, रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळेश्वर येथे सट्टा अड्डा सुरू आहे, अशी माहिती सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी माहिती घेतली. त्यावेळी गोळेश्वरात सज्जाद युनुस कच्छी यांच्या मालकीच्या माया एलाईटी कॉंटी रोहाउसमध्ये चौघे जण सट्टा घेतात, अशी माहिती मिळाली.

रात्री चेन्नई विरुध्द दिल्ली सामन्यावर फोनने संपर्क साधून सट्टा जुगार घेणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शनिवारी (ता. 17) छापा टाकला. त्यावेळी तेथे चोघे जण हायप्रोफाईल पद्धतीने लोकांकडून फोनवरून सट्टा जुगार चालवत असताना आढळले. त्यांच्याकडे एक एलसीडी, सेटटॉप बॉक्‍स, एक लॅपटॉप, नऊ मोबाईल संच, दुचाकी वाहनांसह जुगारातील रोख रक्कम असा चार लाख दोन हजार 800 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.

Video : परतीच्या पावसाचा तडाखा! जावळीत भात शेतीचे नुकसान

पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, शरद बेबले, मंगेश महाडिक, मुनीर मुल्ला, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, वैभव सावंत, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख, संजय जाधव, विजय सावंत यांनी कारवाईत भाग घेतला. त्याबाबत शहर पोलिस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Video : नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा

Edited By : Siddharth Latkar

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Youth Arrested From Karad IPL Cricket Satara News