चौघांनी बांबू घट्ट पकडत दोरीच्या साह्याने चांद नदीत दोघा बुडणाऱ्यांना वाचविले

संजय जगताप
Wednesday, 16 September 2020

चांदणी चौकाकडे निघालेल्या सचिन देशमुख, विजय लोखंडे व अजय पोळ या तीन युवकांनाही बागडे यांनी थांबवले.

मायणी (जि. सातारा) : येथील चांद नदीवरील बंधाऱ्यावरून जाताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोघांना येथील तरुणांनी मोठ्या परिश्रमाने वाचविले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

येथील महादेव मंदिराजवळील बंधाऱ्यावरून घराकडे जाताना इंदिरानगरात राहणारे नाथा ढोकळे पाय घसरून पाण्यात पडले. हे लक्षात येताच त्यांच्या पाठीमागून निघालेल्या सागर तुपे या युवकाने जिवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहात उडी घेतली. मात्र, दोघांनाही जोरदार प्रवाहाच्या बाहेर येता येईना. दोघेही काही अंतर वाहत गेल्यानंतर त्यांना नदीपात्रातील पाणवनस्पतीचा आधार मिळाला. लगतच्या बायपास रोडने ये-जा करणाऱ्या लोकांकडे त्यांनी हाका मारून मदतीची याचना केली. त्यावेळी तानाजी बागडे हा युवक तेथे धावून आला.

वाईतील रुग्णालयांत 180 कृत्रिम ऑक्‍सिजनसह बेड वाढवणार : प्रांताधिकारी राजापूरकर 

चांदणी चौकाकडे निघालेल्या सचिन देशमुख, विजय लोखंडे व अजय पोळ या तीन युवकांनाही बागडे यांनी थांबवले. घटनेची माहिती दिली. त्यानंतर तानाजी बागडे यांनी स्वतःच्या व विठ्ठल माने यांच्या घरातील दोरखंड आणि बांबू आणला. बांबूला दोरी घट्ट बांधून दोरीची एक बाजूस आपदग्रस्त दोन युवकांच्या दिशेने फेकण्यात आली. चौघांनी बांबू घट्ट पकडत दोरीच्या साह्याने वाहून निघालेल्या दोघांना पाण्याबाहेर सुखरूप काढले. त्यामुळे संकट काळात मदत करणाऱ्या त्या चौघांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

सलमान-संजय दत्तवेळी दयाळु होता मिडिया, रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ बॉलीवूडचं खुलं पत्र

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Youth Saved Life Of Two In Mayani Satara News