लांडग्याच्या हल्ल्यात सोळशीतील शेतकरी थाेडक्यात बचावले

राहूल लेंभे
Wednesday, 6 January 2021

शेलार यांच्यावर पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे सोळशी परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
 

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : सोळशी (ता. कोरेगाव) येथे पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर लांडग्याने हल्ला केला.  ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत महेश हिंदुराव शेलार (वय 45) हे गंभीर जखमी झाले आहेत. कोरेगावच्या उत्तर भागात सध्या ज्वारीचे पिक पोटऱ्यात आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची दिवसरात्र धडपड सुरू आहे. महावितरण कंपनी कधी दिवसा तर रात्री वीजपुरवठा करते. त्यातही सुरळीतपणा नसतो अशी वारंवार शेतक-यांची तक्रार आहे. दिवसा विज असल्यावर बहुतांश शेती पंप सुरू असल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेकजण रात्री पिक भिजवतात. शेलार हे गावच्या पश्चिमेकडील माळ नावाच्या शिवारात रात्री दहा वाजता ज्वारी भिजवन्यासाठी गेले होते. हा परिसर हरेश्वर डोंगराच्या पायथ्याला असल्याने या ठिकाणी लांडगे, कोल्हे, रानडुकरे अशा जंगली श्वापदांचा वावर असतो. 

यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागतात. मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लांडग्याने पाठीमागून शेलार यांच्यावर झडप घातली. हाता पायाला चावा घेतल्याने शेलार जखमी झाले. थंडीपासून संरक्षणासाठी त्यांनी पाठीवर पोत्याची खोळ घेतली होती.  त्यामुळे लांडग्याचा चावा त्यांच्या वर्मी लागला नाही.  शेलार यांच्यावर पिंपोडे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे सोळशी परिसरात घबराट निर्माण झाली आहे.

यशस्वी आयुष्याचा मंत्र: वयाच्या ९५ व्या वर्षीही शाकाहार, व्यायाम अन्‌ उद्यमशीलता

सातारा जिल्हा प्रशासनाने महावितरणास डोंगर परिसरातील गावांना शेतीसाठी दिवसाच वीजपुरवठा करण्याची सूचना करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे.  वन विभागाने वन्य श्वापदांपासून होणारा उपद्रव टाळून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी देखील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

साताऱ्याच्या बहादराची उद्योगात मुकेश अंबानींशी स्पर्धा; ‘दुकान’अ‍ॅप पुढे जिओ मार्ट हतबल 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fox Attacked Farmer From Solashi Koregoan Satara Marathi News