Satara fraud : मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून घातला सहा लाखांना गंडा; नोकरीच्या आमिषाने फसविणाऱ्यास अटक
माझी मंत्रालयात ओळख असून, आरोग्य विभागात नोकरीला लावण्याचे आमिष त्याने तिला दाखवले. त्यानुसार तिच्यासह अन्य एकाकडून राजेशने सहा लाख २० हजार रुपये घेतले होते; परंतु नोकरी लावली नाही, तसेच पैसेही परत दिले नाहीत.
The fraudster arrested for scamming six lakhs by promising fake jobs with ministry connections in Maharashtra.Sakal
सातारा : मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांची सहा लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे.