जनावरांच्या कळपात घुसून बिबट्यांकडून शेळ्यांचा फाडशा

राजेश पाटील
Saturday, 21 November 2020

सह्याद्री व्याघ्र राखीवच्या बफर झोनमधील मस्करवाडी-कसणी येथेही बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला. शेतकऱ्यांसमोरच घडलेल्या या प्रकाराने त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ढेबेवाडी : परिसरात बिबट्याचा उपद्रव वाढतच चालला आहे. मंद्रुळकोळे खुर्द आणि मस्करवाडी (कसणी, ता. पाटण) येथे जनावरांच्या कळपात घुसून बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना दुपारी घडली. 

शेतकऱ्यांसमोरच घडलेल्या या प्रकाराने त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सह्याद्री व्याघ्र राखीवच्या बफर झोनमधील मस्करवाडी-कसणी येथेही बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला. आज रात्री सातच्या सुमारास महिंद येथेही काही जणांनी बिबट्याला रस्ता ओलांडताना पाहिले. गावात रताळे विक्रीसाठी बाहेरगावातून आलेले विक्रेते घराकडे परतत असताना त्यांना गावाजवळच्या पुलाजवळ बिबट्या दिसला.

कलेढोणला लाखोंच्या शेती साहित्याची चोरी; तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Movement Of Leopard In Dhebewadi Area Satara News