esakal | जिंती परिसरात बिबट्याची बिनधास्त फिरस्ती
sakal

बोलून बातमी शोधा

जिंती परिसरात बिबट्याची बिनधास्त फिरस्ती

दोन महिन्यांपूर्वी काशिनाथ पाटील या शेतकऱ्यांच्या वस्तीवरील रेडकू बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली होती. त्यावेळी सलग 15 दिवस बिबट्या व बिबट्यांच्या पिलाचा वावर परिसरातील शेतकऱ्यांना आढळून आला होता. त्यावेळी खोचरे वस्तीजवळ ग्रामस्थांना बिबट्या पाहायला मिळाला होता, तर घटना घडलेल्या परिसरात उसाच्या शेतातच काही दिवसांपूर्वी बिबट्यांचे बछडे शेतकऱ्यांना आढळून आले होते.

जिंती परिसरात बिबट्याची बिनधास्त फिरस्ती

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : जिंती परिसरातील डोंगरकपाऱ्यांसह शेतशिवारांसह नागरी वस्तीतही तीन वर्षांपासून मादी बिबट्या तिच्या दोन बछड्यांसह सातत्याने नजरेस येत असल्याने शेतकऱ्यांत घबराट आहे. सायंकाळी, पहाटे कोणीही बाहेर पडायलाच तयार होत नाही. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. त्याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

दोन महिन्यांपूर्वी काशिनाथ पाटील या शेतकऱ्यांच्या वस्तीवरील रेडकू बिबट्याने फस्त केल्याची घटना घडली होती. त्यावेळी सलग 15 दिवस बिबट्या व बिबट्यांच्या पिलाचा वावर परिसरातील शेतकऱ्यांना आढळून आला होता. त्यावेळी खोचरे वस्तीजवळ ग्रामस्थांना बिबट्या पाहायला मिळाला होता तर घटना घडलेल्या परिसरात उसाच्या शेतातच काही दिवसांपूर्वी बिबट्यांचे बछडे शेतकऱ्यांना आढळून आले होते. घटनास्थळी कोळे परिमंडलचे वन अधिकारी सुभाष पाटील, वनरक्षक सचिन खंडागळे यांनी भेट देऊन कऱ्हाड दक्षिण डोंगरी भाग बिबट्या प्रवणक्षेत्र बनले असल्याने बिबट्याचा या परिसरात जास्त वावर आहे. शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून सायंकाळी शेतात जाऊ नये. शेतातील वस्ती, घरे या ठिकाणी रात्रीचा लाइटचा वापर करावा व जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन केले होते. 

कलेढोणला वरुणराजाची जोरदार हजेरी, द्राक्षबागांचे मोठे नुकसान

घटनेनंतर दहा ते 12 वेळा जिंती तलाव, पिराचा डोंगर, वाघजाई डोंगर, खोचरेवाडी या परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व प्रवाशांना बिबट्या व बिबट्याची एक वर्ष वयापेक्षा मोठे असणारे बछडे आढळल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे सुरू असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत शेतीची कामे करावी लागत आहेत. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे उजेडाबरोबरच शेताची कामे अर्धवट सोडून घरी परतत आहेत. यामुळे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र पाटील, पोलिस पाटील संतोष पाटील यांनी वन विभागाकडे केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image