सातारा : बाधित महिलांना मोफत बियाणे, खते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Neelam Gorhe

सातारा : बाधित महिलांना मोफत बियाणे, खते

सातारा - कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांना, तसेच कोविड एकल महिलांना शासनाकडून तीन एकरांपर्यंत मोफत बियाणे व खते मिळणार आहेत. त्यासाठी कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि माणदेशी महिला बॅंकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात शासनाने केलेल्या कोविड उपाययोजना जनतेपर्यंत किती पोचल्या, याचा आढावा घेण्यासाठी उपसभापती गोऱ्हे साताऱ्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, ‘‘कोविडमुळे जिल्ह्यातील २२०२ जणांचा मृत्यू झाला असून, त्या सर्वांना ५० हजारांची मदत मिळालेली आहे. यातील ९८९ एक पालक असलेले असून, पतीचे निधन झालेल्या ८५० महिला आहेत. यातील शेतकरी महिलांना तीन एकरांपर्यंत बियाणे व खते मोफत द्यावीत, अशी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी आता कृषी विभाग, जिल्हाधिकारी, माणदेशी महिला बॅंक करणार आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये जादा बिलांची आकारणी केली होती, त्याचा अहवाल उद्या मिळणार आहे.’’ गरीब लोकांना धर्मादाय रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात येतात. त्यातील शिल्लक बेड समजावेत, यासाठी रुग्णालयांनी डॅश बोर्ड करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली आहे.

श्रमिक कामगारांच्या पोर्टलवर १७ ते ३० मे या कालावधीत नोंदणी सुरू होणार आहे. महामंडळांनी कोविड एकल महिलांना मदत करावी, अशीही सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. पूर परिस्थितीत कोल्हापूरच्या धर्तीवर साताऱ्यातही ॲप तयार करावे. त्यासाठी शंभर गावांचा त्यामध्ये समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या मालमत्ता हस्तांतरणाचा प्रश्नही निकाली काढण्यासाठी पालिका व महानगरपालिकांना सूचना त्यांनी केल्या. सातारा जिल्ह्याला कोविडअंतर्गत ७० कोटींची मदत दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Free Seeds Fertilizers To Affected Women Neelam Gorhe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top