
कोरेगाव : भाडळे (ता. कोरेगाव) येथील जवान प्रकाश मधुकर खरात (वय ३५) यांना आज जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आले. ते सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. त्यांचे पार्थिव आज खराब हवामानामुळे तेथून आज रात्री उशिरापर्यंत अद्याप निघालेले नव्हते. त्यामुळे ते कधी येईल, हे सांगता येत नाही.