

Newly commissioned Lieutenant with family members celebrating his achievement.
sakal
-राजेंद्र शिंदे
खटाव : सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्माने पावन झालेल्या भोसरे या छोट्या गावातील शेतकरी, कष्टकरी व एकत्र कुटुंब पद्धतीची पार्श्वभूमी असलेल्या सुजित संपत जाधव या पट्ट्याने सरसेनापतींचा लढवय्या बाणा दाखवत, शेतातील मातीशी नाळ घट्ट जपत देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले व नुसते बाळगले नाही तर भारतीय लष्करात लेफ्टनंट पदाला गवसणी घालण्याची असामान्य कामगिरी केली आहे.ग्रामीण भागातील तरुणांसाठी आशेचा नवा दीप प्रज्वलित करणारी ही त्याची यशोगाथा आहे.