
-सुधार जाधव
सातारा : आयुष्याच्या प्रवासात अनेक संकटे येत होती... मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सातत्याने प्रयत्न करीत राहिलो.. त्यामुळेच यशाचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरलो.हा प्रेरणादायी प्रवास राहिला आहे सातारा येथील डॉ आदित्य चिंचकर याचा युपीएससी) संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या केंद्रीय आर्किटेक्चर सर्व्हिसेस परिक्षेत सातारा येथील डॉ आदित्यची याची केंद्रीय लोकनिर्माण विभाग(C.P.W.D) निवड झाली आहे.डेप्युटी आर्किटेक्ट श्रेणी एक पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्रातील फक्त दोन विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश आहे. त्यामध्ये आदित्यने 40 वी रँक प्राप्त केली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातून त्याचे काैतुक हाेत आहे.