Success Story: 'अर्धांगवायूवर मात करत संदेश घाडगेची प्राध्यापक पदाला गवसणी'; यूजीसी नेट परीक्षेत यश, आई- वडीलाचं स्वप्न सत्यात उरवलं
From Struggles to Success: आई- वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताचीच. वडील शेती करत गावचे कोतवालीचे काम करत असताना अशा परिस्थितीत येरणे गावात सातवीपर्यंत शिक्षण घेत पुढील शिक्षणासाठी मेढा (ता. जावळी) येथे भाड्याने खोली घेऊन माध्यमिक शिक्षण सुरू केले.
Sandesh Ghadge, who overcame paralysis, proudly clears UGC NET to fulfill his dream of becoming a professor.Sakal
कास : महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम येरणे गावातील संदेश भीमराव घाडगे याने यूजीसी नेट परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करत आपले प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याने एक यशस्वी पाऊल टाकले आहे.