

Ankita Patil’s UPSC Double Victory Inspires Young Aspirants
sakal
रेठरे बुद्रुक: जिद्द, चिकाटी आणि कष्टाची जोड असेल, तर कोणतेही शिखर सर करणे अशक्य नसते, हेच कऱ्हाडच्या अंकिता अनिल पाटील हिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत सलग दुसऱ्यांदा घवघवीत यश मिळवत अंकिताने अखिल भारतीय स्तरावर १४० वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीच्या ३०३ व्या क्रमांकावरून यंदा १४० व्या रँकपर्यंत घेतलेली ही झेप स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली आहे.