

Against All Odds: Ashram School Child Becomes Block Development Officer
Sakal
-भोलेनाथ केवटे
सातारा : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व कसं निर्माण करावं, याचं उदाहरण म्हणजे दत्तात्रय नाना खाडे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पाच बहिणी आणि एका भावाचा मोठा परिवार, आई-वडिलांची शेतीवरची अल्पशी कमाई. अशा परिस्थितीत कधी आश्रमशाळेत, कधी समाजकल्याणच्या वसतिगृहात, तर कधी बहिणीकडे राहून शिक्षण पूर्ण करत, गटविकास अधिकारी पदापर्यंतच्या (वर्ग एक) यशस्वी टप्प्यावर त्यांचे पोचणे म्हणजे, प्रखर काळोखात लावलेला ‘ज्ञानदीप’च ठरावा.