

100th Marathi Literary Conference to Be Held in Pune, Says Deputy CM
sakal
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा): मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देताना सरकारने कधीही हात आखडता घेतलेला नाही. माय मराठीच्या संवर्धनासाठी तसेच शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात दिली. शंभरावे अखिल भारतीय साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा करत साताऱ्यातील संमेलनाचे मोठ्या उत्साहात सूप वाजले.