EVM Machine : 'कुठलेही बटण दाबले तरी मत कमळालाच'! साताऱ्यात निघणार EVM मशिनची अंत्ययात्रा

निवडणुकीत ईव्हीएम मशिन (EVM Machine) हॅक करता येत असल्याने देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे.
EVM Machine Satara
EVM Machine Sataraesakal
Updated on
Summary

मशिनचे कुठलेही बटण दाबले तरी मत कमळावरच जात असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे कोट्यवधी मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे.

सातारा : निवडणुकीत ईव्हीएम मशिन (EVM Machine) हॅक करता येत असल्याने देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिनवर मतदान न घेता मतपत्रिकांवरच घ्याव्यात, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २३) राजवाडा येथील गांधी मैदानावरून सकाळी दहा वाजता ईव्हीएम मशिनची अंत्ययात्रा निघणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे.

या अंत्ययात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी व इतर सर्व घटक पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी पत्रकार परिषदेत दिली. माने म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) ज्येष्ठ वकील भानुप्रतापसिंग आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी गेली चार दिवस जंतरमंतरवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन हॅक करता येते, हे देशाला दाखवून दिले आहे.

EVM Machine Satara
'मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू, मनोज जरांगेंनी मुंबईत येऊन उपोषण करू नये'; असं का म्हणाले मुश्रीफ?

मशिनचे कुठलेही बटण दाबले तरी मत कमळावरच जात असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे कोट्यवधी मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. निवडणूक आयोगात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. लोकसभेतील बहुमताचा वापर करून विरोधकांना संसदेबाहेरचा रस्ता दाखवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला डावलून अनेक कायदे पास केले जात आहेत.

EVM Machine Satara
Sunil Tatkare : 'महाराष्ट्रात अजित पवारांना मोठं पाठबळ, आगामी निवडणुकीत 100 टक्के सिद्ध होईल'

ईव्हीएम मशिन व व्हीव्ही पॅट मशिनबाबत प्रचंड तक्रारी आहेत. भारतीय जनता पक्ष वगळता संपूर्ण देशाचे मत आहे, की निवडणुका मतपत्रिकांवर घ्यावात. त्यासाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com