Udayanraje Bhosale : एक लाख 'रामज्योती'ने उजळणार सातारा; गांधी मैदानावर उदयनराजेंच्या हस्ते महाआरती

अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे.
Ayodhya Ram Mandir Udayanraje Bhosale
Ayodhya Ram Mandir Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गावातील किमान एका मंदिरात केले जाणार आहे. या दिवशी सर्वत्र रांगोळ्या काढून, गुढ्या उभारून, रामज्योत पेटवून आनंदोत्सव साजरा केला जाईल.

सातारा : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्याचा उत्सव देशभरात होत असून, जिल्ह्यात हा उत्सव प्रत्येक मंदिरात, घराघरांत केला जाईल. यादिवशी साताऱ्यातील गांधी मैदानावर (Gandhi Maidan) सायंकाळी सहा वाजता एक लाख रामज्योती पेटविल्या जाणार आहेत. या वेळी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या हस्ते महाआरती होणार आहे.

Ayodhya Ram Mandir Udayanraje Bhosale
'माझे आणि प्रभू श्रीरामांचे वेगळेच ऋणानुबंध, कारण माझा जन्म रामनवमी दिवशीचा'; असं का म्हणाले मुश्रीफ?

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून रामज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (Dhairyasheel Kadam) यांनी केले आहे. जिल्हाध्यक्ष कदम यांनी खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

Ayodhya Ram Mandir Udayanraje Bhosale
तब्बल 25 हजार चौरस फूट जागेत साकारली प्रभू श्रीरामांची प्रतिअयोध्या; 167 खांब, 20×39 चा गाभारा अन् बरंच काही..

या वेळी विकास गोसावी, चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, विठ्ठल बलशेटवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. कदम म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानिमित्ताने देशभरात मंदिरांची स्वच्छता केली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे काळाराम मंदिर येथून याबाबतचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गाव, शहरातील मंदिरांची स्वच्छता केली जात असून, लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यात सहभागी होत आहेत.’’

या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, मदन भोसले, अतुल भोसले, मनोज घोरपडे आदींसह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित राहणार आहेत, असेही कदम यांनी सांगितले.

Ayodhya Ram Mandir Udayanraje Bhosale
'यशाला शॉर्टकट नाहीच'! MPSC मध्ये प्रथम आलेल्या विनायक पाटलांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला 'हा' मोलाचा सल्ला

गावागावांत प्रक्षेपण

राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गावातील किमान एका मंदिरात केले जाणार आहे. या दिवशी सर्वत्र रांगोळ्या काढून, गुढ्या उभारून, रामज्योत पेटवून आनंदोत्सव साजरा केला जाईल. सकाळी ११.२० ते दुपारी १२.३० या दरम्यान मंदिरात, घराघरांत अक्षतांचे पूजन केले जाईल. त्याच दिवशी साताऱ्यातील गांधी मैदानावर येथे सायंकाळी सहा वाजता एक लाख रामज्योती प्रज्वलित केल्या जातील. तेथे रामरक्षा स्तोत्र पठण, तसेच उदयनराजेंच्या हस्ते महाआरती होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
ayodhya ram mandir julan utsav
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Swami Govind Dev Giri
Marathi News Esakal
www.esakal.com