गणेशोत्सवचा तारळेकरांनी घेतला 'हा' निर्णय

यशवंतदत्त बेंद्रे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून वाचलेल्या पैशातून आपापल्या वॉर्डात मास्क, सॅनिटायझर, सी व्हिटॅमिन तत्सम कोरोना प्रतिबंधक साहित्य वितरित करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तारळे (जि.सातारा)  : कोरोना महामारीने संपूर्ण मानव जातीला ग्रासलेले असल्याने तारळेकरांनी आगामी गणेशोत्सव नेहमीच्या पद्धतीने साजरा न करता एक गाव, एक गणपती उत्सव साजरा करावा, असे आवाहन उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले असता सर्व गणेश मंडळांनी या आवाहनास प्रतिसाद दिला.
कऱ्हाड, पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित गणेशोत्सव नियोजन बैठकीत श्री. गोरड बोलत होते. या वेळी सरपंच मीना परदेशी, उपसरपंच प्रल्हाद पवार, उपसभापती अभिजित जाधव, अभिजित पाटील, सदाभाऊ जाधव, रामभाऊ लाहोटी, युवराज नलवडे, रामचंद्र देशमुख, श्रीकांत सोनावले, उपनिरीक्षक मोहन तलवार, यशोदीप तांबे आदींची उपस्थिती होती.

'या' मंडळांनी केला सार्वजनिक गणेशोत्सव रद्द
 

श्री. गोरड म्हणाले, ""साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून वाचलेल्या पैशातून आपापल्या वॉर्डात मास्क, सॅनिटायझर, सी व्हिटॅमिन तत्सम कोरोना प्रतिबंधक साहित्य वितरित करावे'' या वेळी सदाभाऊ जाधव, रामभाऊ लाहोटी, अभिजित जाधव, रामचंद्र देशमुख आदींनी मनोगत व्यक्त करून एक गाव एक गणपतीला पाठिंबा दर्शविला. उपनिरीक्षक मोहन तलवार यांनी स्वागत केले. युवराज नलवडे यांनी आभार मानले. या वेळी तारळ्यातील सर्व मंडळांचे अध्यक्ष उपस्थित होते.
संपादन - संजय शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival In Tarale Will Be Celebrated In Simple Way