
सातारा : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी जिल्ह्यातील गणेश विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी एक हजार ४२३ गावांमध्ये कृत्रिम तळी, जुन्या वापराविना असलेल्या पडक्या विहिरीत सोय केली आहे. नद्या, तलाव, विहिरीमध्ये मूर्ती विसर्जन टाळून जलप्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे सुपूर्द करण्यासाठी दोनशेहून अधिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला असून, निर्माल्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध केली आहे.