

Pune Bengaluru Highway Traffic Jam At Anewadi Toll Plaza After Ganesh Festival As Vehicles Queue For Five Kilometers
esakal
आनेवाडी : गणेश विसर्जनानंतर सलग दोन दिवस सुट्टी असल्याने गणपती उत्सवासाठी गावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणेच्या दिशेने परतू लागले आहेत. त्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गावर रविवारी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. आनेवाडी येथील टोल नाक्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी गर्दी झाल्याने पुणे दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.