सातारा : 'या' गावातील गणेशमूर्ती मुंबईकरांच्या मखरात होणार विराजमान

दिलीपकुमार चिंचकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

विविध आकारांत, रंगात, टिकल्या आणि इतर साहित्याने सजविलेल्या मूर्तींना सातारकरांप्रमाणे मुंबईकरांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षी एक तीन फूट उंचीच्या मूर्तीच्या किमती आकार, कलाकुसर आणि सजावटीप्रमाणे साधारण 500 ते चार हजार रुपयापर्यंत राहतील. 

सातारा : "कोरोना'चा धुमाकूळ असो नाहीतर आणखी कुठले संकट, माणसांच्या श्रद्धा कधी पातळ होत नाहीत. त्यामुळेच परळी (ता. सातारा) येथील गणपती यावर्षीही मुंबईकरांच्या मखरात विराजमान होणार आहेत. परळीतील आकर्षक गणेशमूर्ती ट्रकच्या ट्रक भरून मुंबईत पोचल्याही. दरम्यान, कोरोनाची संचारबंदी, कच्चा माल, रंग, इतर साहित्य मिळण्यात काही अडचणी आल्या तरीही गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ होणार नाही, अशी माहिती उमेश वाईकर यांनी दिली. 

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव नेहमीच उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीचे सावट आहे. परंतु, भीती असली तरीही गुढीपाडव्यापासून नागपंचमीपर्यंतचे सर्व सण नागरिकांनी काळजी घेत साजरे केले. त्याप्रमाणे नागरिक गणेशोत्सवही साजरा करणारच. प्रशासनाने हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. 

लोकमान्यांच्या ‘गीतारहस्याला’ ‘श्रीं’ची प्रेरणा, संत गजानन महाराजांच्या भेटीतून साकारले मंडालेच्या तुरुंगातील गीतारहस्य 

साताऱ्यानजीकच्या परळी येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मूर्ती तयार केल्या जातात. श्री. वाईकर आणि येथील विविध कारखान्यात वर्षभर मूर्ती तयार करण्याचे काम चालते. यावर्षी संचारबंदीमुळे सुमारे अडीच महिने मूर्तीकाम बंद ठेवावे लागले. मूर्ती कारखान्यात परिसरातील महिला, महाविद्यालयांत शिकणाऱ्या युवती, युवक आणि गरजूंना रोजगार मिळतो. येथील मुले, सारेजण मूर्तीवर कलाकुसर करण्यात कायम दंग झालेली असतात. येथील कारखान्यातील मूर्ती मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविल्या जातात. आजवर सुमारे आठ ते दहा ट्रक मूर्ती पाठवल्या आहेत.

अभिनेते सयाजी शिंदेंची झाडांशी घट्ट मैत्री...! 

मूर्तींची किंमत 500 ते चार हजारांपर्यंत 

विविध आकारांत, रंगात, टिकल्या आणि इतर साहित्याने सजविलेल्या मूर्तींना सातारकरांप्रमाणे मुंबईकरांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षी एक तीन फूट उंचीच्या मूर्तीच्या किमती आकार, कलाकुसर आणि सजावटीप्रमाणे साधारण 500 ते चार हजार रुपयापर्यंत राहतील.

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpati Idols Sent To Mumbai From Parali Village Satara District