साताऱ्याच्या कंदी पेढ्यांविषयी उदयनराजे म्हणाले...

उमेश बांबरे
सोमवार, 13 जुलै 2020

त्यासाठीच पेढे उत्पादकांची संस्था स्थापन करून तिची नोंदणी केली जाईल. त्यासाठी संग्राम बर्गे यांनी पुढाकार घेतला आहे.
 

सातारा : सातारी कंदी पेढ्यांमुळे जिल्ह्याची जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख अधिकाधिक ठळक करण्यासाठीच येथील कंदी पेढे व्यावसायिकांची संस्था स्थापन केली जाईल, तसेच कंदी पेढ्याला जीआय मार्क मिळवण्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल, असा शब्द खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.
सातारा जिल्ह्यातील 'हे' शहर पुढचे पाच दिवस राहणार बंद
 
जलमंदिर पॅलेस येथे सातारा शहर परिसरातील कंदी पेढे व्यावसायिकांची सोशल डिस्टन्सिंग पाळून नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमवेत विशेष बैठक झाली. या वेळी संग्राम बर्गे, वसंतशेठ जोशी, योगेश मोदी, अर्जुन मोदी, कन्हैय्यालाल राजपुरोहित, प्रशांत मोदी, महेश निकम, विशाल मोदी, ओंकार जगदाळे, श्रीधर पारुदेकर, सुजित जाधव आदी उपस्थित होते.

बेरोजगार आहात? काळजी करू नका, प्रशिक्षणादरम्यान मिळणार पगार अन्‌ त्यानंतर नोकरीची हमी!
 
उदयनराजे म्हणाले, ""महाराष्ट्रात कंदी पेढे सर्वत्र मिळत असले, तरी साताऱ्याच्या कंदी पेढ्यांची वेगळी चव आणि ओळख सातासमुद्रापार पोचली आहे. सातारी कंदी पेढे तयार करण्याची परंपरागत पद्धत हायजेनिक आहे. सध्या अत्याधुनिक यंत्र सामग्रीमुळे परंपरागत पद्धत अगदी काही मोजक्‍याच ठिकाणी पाहायला मिळते. जगाच्या पाठीवर सातारी कंदी पेढ्यांची ओळख अधिक ठळक करण्यासाठी कंदी पेढे उत्पादकांचे एकीकरण करून व्यावसायिकांची संस्था स्थापन केली जाईल. सामूहिकरीत्या कंदी पेढ्यांना जिऑग्राफिकल आयडेंटी फिकेशन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, तसेच त्याला कायदेशीर मानांकन मिळाले पाहिजे. त्यासाठीच पेढे उत्पादकांची संस्था स्थापन करून तिची नोंदणी केली जाईल. त्यासाठी संग्राम बर्गे यांनी पुढाकार घेतला आहे.''

संपादन - संजय शिंदे

शेतकऱ्यांसाठी उदयनराजे समर्थकांचा 'या' गाेष्टीला विरोध 

बैलगाडी शर्यतीचा शाैक 'त्यांना' नडला, मूलाच्या सांगण्यावरुन गुन्हा नाेंद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Geographical Tagging Is Must For Satara Kandi Pedha Says MP Udayanraje Bhosale