पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? साताऱ्यात जादुटोणा करुन युवतीवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

'नराधमानं तिला एकटीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवला.'

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? साताऱ्यात जादुटोणा करुन युवतीवर अत्याचार

सातारा : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका युवकानं जादुटोणा करुन युवतीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यात उघडकीस आलीय. शहरातील एका काॅलनीत ही धक्कादायक घटना घडलीय.

या प्रकरणी पोलिसांनी मुक्तार नासीर शेख याला ताब्यात घेतलंय. शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Satara Police) दिलीय. युवतीनं दिलेल्या तक्रारीत शेख यानं तिला एकटीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबू फिरवला. त्यानंतर तिला भोवळ आल्याने जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

हेही वाचा: Karnataka : मुख्यमंत्रिपदाची 'खुर्ची' 2500 कोटींना विकली; काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

या घडलेल्या प्रकारामुळं साताऱ्यात खळबळ माजलीय. या प्रकारावरुन पोलिसांनी ३७६ आणि २०१ चे ३ कलम ३ प्रमाणं गुन्हा दाखल केलाय. मुक्तार नासीर शेख याला ताब्यात घेतल्याचं संजय पतंगे (पोलिस निरीक्षक, शाहूपुरी पोलिस स्टेशन, सातारा) यांनी सांगितलंय. याबाबत अधिक तपास पोलिस करत असल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा: Britain PM Election : माझ्याकडं गमावण्यासारखं काहीच नाही, पण मी मागं हटणार नाही : ऋषी सुनक

Web Title: Girl Assaulted In Satara Naseer Sheikh Arrested Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newssatara police