प्रवेशासाठी पैसे न मिळाल्यामुळं मुलीची विषारी औषध पिऊन आत्महत्या

Satara Crime News
Satara Crime Newsesakal
Summary

आर्इ मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती.

सातारा : भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात (Recruitment Training Center) प्रवेश घेण्यासाठी पैसे न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. संबंधित मुलीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

तिची आर्इ मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती. मुलगी अकरावीत शिकत होती. तिला पोलिस भरती (Police Recruitment) व्हायचे होते. त्यासाठी तिला भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यायचा होता. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे आर्इने पैसे दिले नाहीत. आपण पैसे आल्यावर प्रवेश घेऊ, असे तिने सांगितले.

Satara Crime News
प्रियकरानं पत्नीलासोबत घेऊन प्रेयसीचा काढला काटा

या नैराश्यातून संबंधित मुलीने सोमवारी (ता. 28) विषारी औषध पिले. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Satara Hospital) दाखल करण्यात आले होते; परंतु काल रात्री तिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात (Satara Police Station) नोंद झाली आहे. हवालदार आशिष कुमठेकर तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com