
सातारा : येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती, तसेच सातारा पालिकेच्या वतीने राज्याभिषेक दिनाच्या औचित्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांचा भाग असणाऱ्या मिरवणुकीत सोमवारी सायंकाळी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामुळे शिवकाळ अवतरल्याचा भास निर्माण झाला होता.