सातारा : कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव

एकरी रोपासाठी ४५ हजार दर; अवकाळीत रोपांची हानी, लागवड वाढीचाही परिणाम
onion
onionsakal
Updated on

बुध : अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना (Onion seedlings)सोन्याचा भाव आला आहे. यावर्षी उत्तर खटाव परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे नेर धरणासह सर्वच छोटे-मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर (Onion crop) भर दिला आहे.

onion
चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

बुध, नागनाथवाडी, फडतरवाडी, काटेवाडी, वेटणे, नेर आदी भागांत कांदा लागवडीत कमालीची वाढ झाली आहे. परतीच्या व अवकाळी पावसाने कांद्याची आगाप लागवड केलेल्या राजापूर, वेटणे, पांगरखेल, चिंचणी, मोळ या भागातील कांद्याचे पीक पूर्णतः वाया गेले असून, अनेक शेतकऱ्यांनी शेतात रोटर फिरवला आहे तर काहींनी कांद्याच्या उभ्या पिकात मेंढरे सोडली आहेत. आगाप कांद्याचे नुकसान झाले असतानाच उन्हाळ कांद्याची रोपेही सडून गेल्याने सध्या उन्हाळ कांद्याच्या लागवडीवर परिणाम होत आहे. आगाप कांद्याचे नुकसान झाल्याने भविष्यात कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने उन्हाळी कांद्याच्या लागवडीसाठी शेतकरी रोपांची शोधाशोध करत असून, मोठ्या प्रमाणावर रोपे खराब झालेली असताना मुरमाड जमिनीवरील पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या रोपांची सोन्याच्या भावात विक्री होत आहे. एक एकर कांदा रोपासाठी ४० ते ४५ हजार रुपये दर फुटला असून, शेतकरी कांदा रोपासाठी भटकंती करताना दिसत आहेत.

onion
मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

अवकाळी पावसाने सतत १५ दिवस जोरदार हजेरी लावल्यामुळे वाफ्यात पाणी साचून राहिल्याने कांदा रोपे खराब झाली. अतिवृष्टीमुळे रोपे गेल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा रोपे विकत घेऊन लागवडी पूर्ण केल्या. रोपांच्या टंचाईमुळे कांदा रोपांना सोन्याचा भाव मिळाला तर काही शेतकऱ्यांनी उशिराने लागवड करण्यापेक्षा कांदा पेरणीस प्राधान्य दिले. ज्या शेतकऱ्यांनी दुबार कांद्याची रोपे टाकली, ती सध्या लागवडीस आली आहेत. त्यामुळे जानेवारी महिना उजाडला तरी उत्तर खटाव परिसरात कांदा लागणी सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी वळला गहू, हरभऱ्याकडे दरम्यान, रोपे उपलब्ध न झाल्याने अखेर शेतकरी गहू, हरभरा पिकाकडे वळला असून, यावर्षी गहू, हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. खटाव, माण या कांद्याच्या आगारातील शेतकऱ्यांना गतवर्षीही कांद्याच्या रोपांअभावी इतर पिकांकडे वळण्याची वेळ आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Road Accident Couple Killed Returning From Pune After Car Crashes Into Eicher Truck Son Critical
Neelam Gorhe
Koyna Dam water level today live
Kas Plateau Tourism Update Holiday Crowd at Kas Lake Leads to Parking Crisis Traffic Jams and Disorder
Marathi News Esakal
www.esakal.com