
कऱ्हाड : वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघालेल्या विवाहितेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळ्यांचे गंठण धूमस्टाइलने चोरट्यांनी लंपास केले. गोळेश्वर येथील कदम वस्तीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रूपा संदीप कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.