
सातारा : ३१ मे रोजी बुढानिलकंठा महानगर पालिका, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या आशियाई मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याचे जावळी तालुक्यातील अंधारी गावचे सुपुत्र अनेक राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर धनाजी शेलार यांनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत अनेक मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना हरवून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.