
सातारा : कोयना सिंचन विभाग कोयनानगर विभागांतर्गत कोयना, तारळी, उत्तरमांड, उत्तरवांग, वांग नदी, मध्यम प्रकल्प व लहू पाटबंधारे तलावांवरून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरण्यास कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे काही सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या विनंतीवरून पाणीपट्टी भरण्यास २० मार्चअखेर मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.