

Satara District Gets Green Boost with Five Plastic Waste Processing Units
sakal
-प्रशांत घाडगे
सातारा : पर्यावरणाची होत चाललेली हानी, प्लॅस्टिक कचरा आणि स्वच्छतेसमोरील आव्हाने लक्षात घेऊन जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी प्लॅस्टिक पुनर्रोपण प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून तब्बल तीन कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील कचरा व्यवस्थापनाचे पर्यावरणपूरक नियोजन होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ठिकाणी प्रक्रिया केंद्र होणार आहेत.