गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेचे दर्शन घेताना उदयनराजेंना अश्रू अनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

आपल्या ह्रदयात मानाचे स्थान दिलेल्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेताना खासदार उदयनराजे भोसले भावनाविवश झाले.

गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेचे दर्शन घेताना उदयनराजेंना अश्रू अनावर

दहिवडी - आपल्या ह्रदयात मानाचे स्थान दिलेल्या कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेताना खासदार उदयनराजे भोसले भावनाविवश झाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त खासदार उदयनराजे भोसले हे शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या दर्शनाला आले होते. दर्शन व अभिषेक झाल्यानंतर परतीच्या प्रवासात त्यांनी दहिवडी येथील चैतन्य करिअर अकॅडमीला भेट दिली.

या भेटी दरम्यान त्यांनी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यावेळी ते भावनाविवश झाले व त्यांना अश्रू अनावर झाले. यानंतर त्यांना भेट म्हणून त्यांची स्वतःची प्रतिमा देण्यात येणार होती त्याऐवजी त्यांनी भेट म्हणून कै. गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा स्विकारली. यावेळी त्यांनी सदर प्रतिमेचे चुंबन घेतले.

Web Title: Gopinath Munde Photo Darshan Udayanraje Bhosale Tears

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..