
औंध : गोपूज येथील शेरी नावाच्या शिवारात मनीषा दत्तात्रय घार्गे यांचा एक एकर लागणीचा ऊस आहे. त्या शेतावरून शेती वाहिनीची विद्युत वाहिका गेली आहे. रविवारी शॉर्टसर्किट होऊन उसामध्ये ठिणग्या पडल्या, त्यानंतर काही वेळातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आग लागल्याचे समजले. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केला.