
सातारा : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत तीन लाख ९८ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांच्या एक लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.