- सिद्धार्थ लाटकर
सातारा : स्वतःचे घर असावे, असे स्वप्न पाहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्च २०२१ मध्ये महिलांच्या नावावर दस्त नोंदणी करणाऱ्यांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा लाभ सातारा जिल्ह्यातील १,२५२ महिलांनी घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही साताऱ्याची ६१९ व पाठोपाठ कऱ्हाडची ४०६ इतकी आहे. मेढा आणि महाबळेश्वर तालुक्यात एकाही महिलेने योजनेचा लाभ घेतलेला नाही.