esakal | 'कोविड सेंटर'साठी झेडपीच्या सदस्याचा उपोषणाचा इशारा; पालकमंत्र्यांनी घेतली दखल

बोलून बातमी शोधा

Covid Care Center

'कोविड सेंटर'साठी झेडपीच्या सदस्याचा उपोषणाचा इशारा; पालकमंत्र्यांनी घेतली दखल

sakal_logo
By
अंकुश चव्हाण

कलेढोण (सातारा) : कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पडळ (ता. खटाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते व जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. गुदगे यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शासकीय कोविड केअर सेंटर सुरू झाले.

या वेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, खटाव पंचायत समिती सभापती जयश्री कदम, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी इन्नुस शेख, डॉ. सुशीलकुमार तुरुकमाने, माजी सभापती संदीप मांडवे, रवींद्र सानप, सरपंच मनीषा सानप आदी उपस्थित होते. या वेळी विधाते म्हणाले, "गरज असेल तेथे कोविड केअर सेंटर उभा करून रुग्णांना सर्व सोईसुविधा प्राधान्याने पुरविल्या जातील. येथील कोविड सेंटरला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.''

Video पाहा : ग्रामस्थांनी एकीतून उभारले आयसोलेशन सेंटर

गुदगे म्हणाले, "70 बेडची क्षमता असलेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये 20 बेड सुरू करण्यात आले आहेत. लवकरच या ठिकाणी ऑक्‍सिजनयुक्त 30 बेड सुरू केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्‍यात व्हेंटिलेटर कक्ष सुरू करावेत त्यामुळे जिल्हा सिव्हिल रुग्णालयावरील ताण कमी होईल.'' पालकमंत्र्यांनी संवेदनशीलतेने हा प्रश्‍न सोडवल्याचेही श्री. गुदगे यांनी सांगितले.

Edited By : Balkrishna Madhale