शाहू महाराजांच्या विचारावर सरकारची वाटचाल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

शाहू महाराजांच्या विचारावर सरकारची वाटचाल : बाळासाहेब पाटील

कऱ्हाड : महाराष्ट्र राज्याला दिशा देण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करून जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजकारण, प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाने पुरोगामी महाराष्ट्राचा पाया त्यांनी रचला. त्यांच्या विचारावर महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटी यांनी केले.

कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांची आज १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सकाळी येथील शाहु चौकातील पुतळ्यास सहकारमंत्री पाटील यांनी पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्राला दिशा, पुरोगामी विचार देण्याचे काम छत्रपती शाहु महाराज यांनी केली. त्यांच्या विचाराने राज्याचा कारभार सुरु आहे.

शाहु महाराजांचे यंदाचे हे शताब्दीवर्ष वैशीष्टपुर्ण साजरे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला. त्यानुसार १०० व्या पुण्यतिथीदीनी आज १०० सेकंद सकाळी दहा वाजता शाहु महाराजांसाठी अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेतला आहे. त्यानिसार आज कऱ्हाडमध्ये शाहु महाराजांच्या पुतळ्यासमोर केला आहे. शाहु महाराजांच्या विचाराने हा पुरोगामी महाराष्ट्र निश्चीतपणे पुढे जाईल.

Web Title: Government Move Shahu Maharaj Thoughts Co Operation Minister Balasaheb Patil Gave Direction State Of Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top