महाराष्ट्र सरकारनं FRP चे दोन तुकडे केले; सदाभाऊ खोतांचा घणाघात I Sadabhau Khot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot

'सध्याच्या सरकारनं शुगरकेन ॲक्ट 1966 चा कायदा मातीत घातला आहे.'

महाराष्ट्र सरकारनं FRP चे दोन तुकडे केले; सदाभाऊ खोतांचा घणाघात

कोपर्डे हवेली (सातारा) : साखर कारखानदार (Sugar Factory) चोर असल्यामुळेच एकरकमी एफआरपी मागतो आहोत. सध्याच्या महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) शुगरकेन पेट्रोल ॲक्ट 1966 चा कायदा मातीत घातला आणि एफआरपीचे दोन तुकडे केले आहेत, असा आरोप माजी मंत्री, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केलाय.

पार्ले येथे जागर शेतकऱ्यांचा.. आक्रोश महाराष्ट्राचा.. या अभियानांतर्गत शेतकरी मेळावा झाला. यावेळी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सागर शिवदास, भारतीय किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, रयत क्रांती सघटनेचे सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रकाश साबळे, पार्लेचे सरपंच आश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, पांडुरंग कोठावळे, राजमाची सरपंच शिवाजी डुबल, स्वातंत्र्य सैनिक शंकर पवार उपस्थित होते.

हेही वाचा: कर्नाटकात काँग्रेसला मोठा झटका; माजी कॅबिनेट मंत्र्यानं सोडला पक्षाचा 'हात'

खोत पुढं म्हणाले, राज्यात शेतकरी, युवकांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. राज्य सरकारनं गहू, तांदूळ फुकट देऊन शेतकऱ्यांच्या मालाची माती केली. कोरोना काळात सरकारनं ऑक्सिजन-बेडमध्ये पैसे खाल्ले, कोणालाही मोफत औषध उपचार मिळाले नाहीत. एमपीएससीच्या परीक्षा थांबवल्या, सरकारनं पोलीस भरतीत घोटाळा केला. सरकारच्या पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांकडं पैसे नव्हते म्हणून एकही वीज कनेक्शन तोडले नाही. मात्र, कोरोना काळात शेतकऱ्यांना वीज माफी देणं गरजेचं होतं. केवळ दहा ते पंधरा हजार कोटींचा प्रश्न होता. परंतु, ते केलं नाही. यांनी (सरकार) बॅंका, दूधसंघ, कारखाने, सुतगिरण्या सारख्या संस्था खाल्ल्या. या सरकारचे सर्व मंत्री भ्रष्टाचारमध्ये गुंतलेले आहेत. यावेळी रामकृष्ण वेताळ, सचिन नलवडे यांची मनोगते झाली. आप्पासासहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कृष्णा मदने यांनी आभार मानले.

हेही वाचा: भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गांच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

सचिन नलवडेंची निवड

पार्ले येथे घेतलेल्या जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियानातंर्गत घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सचिन नलवडे यांची पश्चिम महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांचा सत्कारही झाला.

Web Title: Government Of Maharashtra Damages Frp Sadabhau Khot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top