esakal | Good News : साताऱ्यासह सिंधुदुर्ग, अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Medical College

Good News : साताऱ्यासह सिंधुदुर्ग, अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी मंजूर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : येथे नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Satara Medical College) प्रथम वर्षाकरिता संगणक व इतर खरेदी करण्यास, तसेच आयुर्विज्ञान आयोगाकडून होणाऱ्या निरीक्षणाकरिता यंत्रसामग्री, साधनसामग्री खरेदी करण्यास राज्य योजनेंतर्गत निधी उपलब्धतेसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी दिली आहे. (Government Sanctioned Funds For Satara Medical College Satara Marathi News)

साताऱ्यात नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता संगणक व इतर खरेदीसासाठी 38 लाख 10 हजार इतक्या रक्कमेस 18 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता कोणतीही यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निरीक्षणाकरिता त्यांच्या मानकानुसार शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र व जीवरसायनशास्त्र या विभागांकरिता आवश्यक असलेली यंत्रसामग्री व साधनसामग्रीसाठी सातारा, सिंधुदुर्ग व अलिबाग येथील नव्याने स्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना 8 कोटी 95 लाख 61 हजार 394 इतक्या रक्कमेस 18 मे'च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे, असेही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

मोहफुलाचा दारुसाठीच नाही, तर औषधासाठी देखील वापर होतो; जाणून घ्या 'मोहफुल' काय आहे?

Government Sanctioned Funds For Satara Medical College Satara Marathi News

loading image
go to top