पाटणला शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे, शासन झाडून लागले कामाला

जालिंदर सत्रे
Wednesday, 21 October 2020

राज्यातील महाआघाडी शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाची यंत्रणा कामाला लावली होती. शनिवार व रविवार सुटीचा दिवस असतानाही महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी पंचनामे करण्यात व्यस्त असलेले पाहावयास मिळत होते. सात विभाग व 14 उपविभागात विभागलेल्या पाटण तालुक्‍याच्या दुर्गम भागात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन कर्मचारी पंचनामे करीत होते.

पाटण (जि. सातारा) : चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभाग झाडून कामाला लागला आहे. शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू असल्याने संपूर्ण यंत्रणा कार्यालये सोडून रानात फिरताना पाहावयास मिळत आहेत. 

तालुक्यात चक्रीवादळामुळे संततधार, तर रात्रभर मुसळधार पाऊस पडला होता. काढणीला आलेली खरिपाची पिके भुईसपाट झाली होती. खरिपाच्या काढणीत या पावसामुळे पाच दिवस व्यत्यय आला होता. कापलेली पिके शेतातच भिजली होती. भुईमूग जागेवर उगवायला लागला होता, तर शिल्लक सोयाबीनचे पीक कुजून काळे पडले होते. कोयना धरणातून पाणीसाठा नियंत्रणासाठी पाणी सोडल्याने नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली होती. ऐन खरिपाच्या काढणीत चक्रीवादळाचा मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध : गृह राज्यमंत्री देसाई

राज्यातील महाआघाडी शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाची यंत्रणा कामाला लावली होती. शनिवार व रविवार सुटीचा दिवस असतानाही महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी पंचनामे करण्यात व्यस्त असलेले पाहावयास मिळत होते. सात विभाग व 14 उपविभागात विभागलेल्या पाटण तालुक्‍याच्या दुर्गम भागात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन कर्मचारी पंचनामे करीत होते. शेतात भुईसपाट झालेले व पाण्यात बुडालेली पिके पाहून कर्मचाऱ्यांची मने हेलावली. तातडीने पंचनामे केल्यामुळे नुकसान झालेली पिके जाग्यावर पाहावयास मिळाली. काही दिवस पंचनाम्यासाठी उशीर झाला असता, तर पंचनाम्याची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पुन्हा काढणीस वेग घेतला होता. त्यामुळे वस्तुस्थिती दर्शक पंचनामे झाले नसते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Starts Inspection Of Rain Damaged Crops Satara News