
तरुणांनो, मोबाईलऐवजी पुस्तक हाती घ्या - राज्यपाल कोश्यारी
भिलार : युवकांनी मोबाइलचा मोह टाळून पुस्तकाचे वाचन करावे. पुस्तक वाचल्याने माणूस समृद्ध होतो, म्हणून पुस्तक आवर्जून वाचा, असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिला. पुस्तकाच्या गावाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करून गावाने प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याची आणि योगदानाची प्रशंसा केली. या गावात तब्बल एक तास राज्यपाल कोश्यारी रममाण झाले.
त्यांनी पुस्तकाचे गाव भिलारला भेट दिली. या वेळी राज्य विकास संस्थेचे सहसचिव शामकांत देवरे, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, पोलिस उपअधीक्षक जान्हवी शीतल जानवे-खराडे, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, वंदना भिलारे, प्रवीण भिलारे, नितीन भिलारे, राजेंद्र भिलारे, तानाजी भिलारे, प्रकल्प समन्वयक विनय मावळणकर, तेजस्विनी भिलारे, गणपत पार्टे आदी उपस्थित होते
प्रकल्प कार्यालयात राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे, नितीन भिलारे आणि राज्य विकास संस्थेचे सहसचिव शामकांत देवरे यांनी केले. प्रकल्प कार्यालयाची ध्वनी- चित्रफीत पाहिली.
त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक (कै.) भिलारे गुरुजी यांच्या निवासस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आणि गडकिल्ले या पुस्तकाच्या दालनास भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत प्रशांत भिलारे, राजेंद्र भिलारे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केले.