रस्त्यासाठी गोवारेकरांचा निवडणुकांवर बहिष्कार

हनुमाननगर रस्त्यासाठी गोवारे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत
गोवारे ग्रामस्थ
गोवारे ग्रामस्थsakal
Updated on: 

कऱ्हाड : कृष्णा कॅनॉल ते गोवारे, हनुमाननगर रस्त्यासाठी गोवारे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देत रस्त्याचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा दिला आहे.

बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, गोवारेचे सरपंच वैभव बोराटे, उपसरपंच विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रावण माने, स्वानंद माळी, जयवंत महाडिक, शिवाजी कदम, सचिन गुरव, अजित पाटील, निसार मुल्ला, कपिल पवार, रूपेश पवार, बसवंत कोळी, ताजुद्दीन पटेल, बंडा चव्हाण, अरुण सावंत, संजय मोरे, अतुल जाधव आदींनी हे निवेदन दिले.

गोवारे ग्रामस्थ
हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह

गोवारे हे गाव कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहे. कृष्णा कालव्यालगतच्या रस्त्याचा वापर गोवारे, चौंडेश्वरी नगर, गजानन सोसायटी, हनुमाननगर, सयापूर, टेंभू या गावातील लोक मोठ्या प्रमाणात करतात. सध्या या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. विधानसभा निवडणूक होऊन सुमारे दोन अडीच वर्षे झाली; पण रस्त्याची अवस्था तशीच आहे. त्यामुळे सर्वांनाच रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा विचार करून ग्रामस्थांनी आज एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न सुटेपर्यंत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभेसह अन्य निवडणुकांतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Raju Shetti warning to sugar factories
Krishna Sugar Factory Karad
High Court Decision on Anil Desai and Rajendra Rajpure Election Eligibility Creates Legal Uncertainty for Seven Other Directors
Sonal Sonawane Success Story From Losing Her Husband to Building a Future for Two Children Through Courage and Determination
Marathi News Esakal
www.esakal.com